MAN TALYAT MALYAT LYRICS | SHAILESH RANDE | SANDIP KHARE
मन तळ्यात मळ्यात..
जाईच्या कळ्यात..
मन नाजुकशी मोतीमाळ
तुझ्या नाजुकश्या गळ्यात..
उरी चाहुलींचे मृगजळ
वाजे पाचोळा उगी तशात..
इथे वार्याला सांगतो गाणी
आणि झुळुक तुझ्या मनात..
भिडू लागे रात अंगालागी
तुझ्या नखाची कोर नभात !
माझ्या नयनी नक्षत्रतारा
आणि चांद तुझ्या डोळ्यांत.