स्वामी समर्थ तारक मंत्र – Swami Samarth Tarak Mantra Marathi Lyrics | Swami Samarth Mantra Marathi | Swami Samarth Mantra Lyrics

स्वामी समर्थ तारक मंत्र – Swami Samarth Tarak Mantra Marathi Lyrics

गुरु ब्रम्हा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा.
गुरु साक्षात परब्रम्हा, तस्मै श्री गुरवे नमः

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना ।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना ।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।२।।

उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे ।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।३।।

खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त ।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।४।।

विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।
बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।~।।

श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।
श्री दत्तगुरु महाराज की जय ।।

भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.
🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌼🌺

अशक्य ही शक्य करतील स्वामी !

श्री स्वामी समर्थ मंत्र
(स्वामी ह्या मंत्राचे कथन / स्मरण नेहमी करत असत)
शिव हर शंकर, नामामी शंकर. शिव शंकर शंभो.
हे गिरिजापती भवानी शंकर. शिव शंकर शंभो.
ॐ नमःशिवाय.

स्वामी समर्थ मंत्राचा जप कसा करावा?
पाण्याने भरलेला एक तांब्याचा पेला घ्यावा व त्यात तुळशी-पत्र टाकावे.
तो पाण्याने भरलेला पेला समर्थांच्या मूर्ती / फोटो समोर ठेवावा.
त्यानंतर शांत चित्ताने हाथ जोडून स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा.
जप झाल्यानंतर पेल्यातले पाणी घरातल्या सर्व माणसांना तीर्थ म्हणून द्यावे.

Leave a Comment

error: Content is protected !!