PUSHPAK PARDESHI – LAJTANA LYRICS | लाजताना

PUSHPAK PARDESHI - LAJTANA LYRICS | लाजताना

PLAY LAJTANA MARATHI SONG

LAJTANA LYRICS | PUSHPAK PARDESHI लाजताना

किती राजरोस यावं तुला भेटण्या दुरून
किती लाजताना बघू तुला डोळे भरून
भारावून जोगी नाचतो तुला आठवता
सवाई चा सूर चुकतो चेहरा तो पाहता
लाजताना …लाजताना ….लाजताना

अधरी खुलली लाली…उठली खळी गोऱ्या गाली.
नाजुक अशी तू हसली… झुलली बट डोळ्याखाली.
चांदणं उतरु आली…डुलली कानी तुझ्या बाली
अल्लड अशी तू सजली कसली दैना नवी झाली

कस्तुरी तुझी दरवळली.. .उरीं ओढ दाटली
पापणी डावी अडखळली…जिवा आस लागली.
बेमालूम धुंद नवी कोणती ही चढली
पदरा अडून मला तू जेव्हा दिसली

कस्तुरी तुझी दरवळली.. .उरीं ओढ दाटली
पापणी डावी अडखळली…जिवा आस लागली.
बेमालूम धुंद नवी कोणती ही चढली
पदरा अडून मला तू जेव्हा दिसली
लाजताना …लाजताना….

हे भिरभिर मन उड वेल्हाळ
तुझ्या नजरेन होई घायाळ…ग घायाळ.
सुखावलं मन घाव झेलून..
धजावल पुन्हा लाज मारून…ग मारून

LAJTANA OFFICIAL VIDEO | TEJAS PADAVE | NITISH CHAVAN | SHIVANI BAOKAR

Leave a Comment

error

Enjoy this blog? Please Follow & Like Us 🙂