हरवून गेले HARVUN GELE MARATHI SONG LYRICS | SAI TAMHANKAR
हरवून गेले…
उभ्या उभ्या साऱ्यामध्ये,
कसे कुणी माझ्यामध्ये,
येऊन गेले…
दिवसातल्या गप्पातूनी,
हसऱ्या जुन्या कप्प्यातूनी,
उचलून नेले…
चूक चुकल्यागत,
मन हुकल्यागत,
सारेच माझे,
तुझ्या पाशी का?
हरवून गेले…जे साथ होते
हरवून गेले…दीन रात होते
हरवून गेले…जे दोन होते
हरवून गेले…एकात होते
अंतरा:
बोलण्याची सोय नाही,
अबोला हा सोसेना…
भेटण्याची ओढ तरीही,
इशारा ही पोचेना…
ठसठसल्यागत
अन् फसल्यागत
मन हे उपाशी,
तुझ्या पाठी का?
हरवून गेले…जे साथ होते
हरवून गेले…दीन रात होते
हरवून गेले…जे दोन होते
हरवून गेले…एकात होते