TU NA MAJHI LYRICS KEVAL WALANJ
तू ना माझी जाहली
श्वासात तू होती हृदयात तू
जगण्यात तू स्वप्नात तू
हाकेत तू होती आवाज तु
कंठात तू ओठात तू
हरवलो मी तुझ्या सवे जाता तू जगण्यातूनी
सावलीही तुझी सखे गेली दिस अंधारूनी
मृगजळाचा छलावा तू
होती फक्त दिखावा तू
मी भटकलो जिथे तिथे
शोधता भास हे तुझे
मी रानामधल्या हरणापरी राहिलो
तू ना माझी जाहली मी नं
माझा राहिलो(२)
जगती मनी येताच तू वसले नवे होते शहर
मग आज का वणवा तिथे होता जिथे फुलला बहर
क्षणभर खरी होतीस तू
होतीस का नव्हतीस तू
त्रासात या तलवारही जखमा करी हृद्यावरी
तू न माझी जाहली मी न माझा राहिलो(२)
MUSIC
भ्रमात तू माझ्या भासात तू
आनंद तू गहिवर तू
सैलही तू होती स्वैरही तू
क्षणभर तू दहिवर तू
तू न माझी जाहली मी ना माझा राहिलो..(२)