LAGNALU 2.0 LYRICS TRANSLATION IN ENGLISH BY PARTH BHALERAO
देवा रं देवा देवा
आरं देवा रं देवा देवा
देवा रं देवा तुला उगाच का म्हणत्यात मायाळू कनवाळू
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय आता तरी नगं टाळू
रेड्यासनी मिळतात म्हशी बी लई अन गायीस नि मिळतात वळू
मग आमच्याच कपाली का न्हाई लीव्हली पायालाई विझळू
आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू…
सोळयाव्या वर्षात समद्याच्या काखेत येतेय प्रेमाच गळू
अन आठवण येऊन कुणाची तरी म्हणे जीव लागे तळमळू
पाटलानं पोरगी उजवली काल आज लगीन करतंय बाळू
हे ऐकून आमच्या बी पिरमाच गांडूळ लागलंय बघ वळवळू
आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू…
येशील घेऊन रूप कुणाचे
कसे सोडवशील प्रॉब्लेम भक्तांचे
दे प्रत्येकाला ज्याचे त्याचे
देवा रं देवा देवा
आता तूच सांग आम्हाला कुणाच्या मागे पळू
कुणाची आम्ही कणिक मळू
आणि गहू कुणाचे दळू
तुझ्याच कुर्पेने नारळात पाणी
अन शेणात उगतंय आळू
जमावशाल तर आमच बी जमतय
जुळतंय बघ हळू हळू
आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू…