
PLAY BHASTES JASHI MARATHI SONG
Audio PlayerBHASTES JASHI LYRICS
उन्हा मधली सर ओली
परदेशात माय बोली
भासते जशी
तू भासतेस तशी
काठावरची अधीर लाट
गावाकडची पायवाट
भासते जशी
तू भासतेस तशी
हो भास् हा तुझा
होतो रोज मजला का
ही आस का तुझी
लागे रोज़ या जीवा
ध्यास लागला
तुझा आहे होण्याचा
सहवास हा तुझा
वाटे का हवा हवा
हृदया मधली ती आरोळी
आनंदाची एक टाळी
मंद झुळूक ती सांजवेली
तू भासतेस तशी
भर रातीला रातरानी
पुराणातली गोड कहानी
भासते जशी
तू भासतेस तशी
हो रोज रातिच्या
स्वप्नामधे तुला बघतो
तुझ्या मनातले वाचावे कैसे
मी रोज़ शिकतो
मी राजा जर तरची राणी
सुरुवात अन अंत दोन्ही
भासतात जशी
तू भासतेस तशी
भासतात जशी
तू भासतेस तशी
भासतात जशी
तू भासतेस तशी