MADHUR SHINDE – GONDHAL MAAY MAULICHA LYRICS

MADHUR SHINDE - GONDHAL MAAY MAULICHA LYRICS

PLAY GONDHAL MAAY MAULICHA MARATHI SONG

GONDHAL MAAY MAULICHA LYRICS – MADHUR SHINDE

आईच्या नावाचा गोंधळ मांडीला
गोंधळाला ये आई गोंधळाला ये आई
गोंधळाला ये

नवरूपाची नवलाई आज बैसली सिंहासनी
आदिमाय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी

आई भवानीच्या नावानं उध उध

नवरूपाची नवलाई आज बैसली सिंहासनी
आदिमाय तू भवानी साऱ्या सृष्टीची जननी
आज गोंधळ मांडला ग ये
गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग

हळद कुंकूचा मळवट कपाळी भरला
साडी चोलीन आईचा शृंगार सजला

उध उध उध उध उध उध

दीप ज्योतीन लखलखला आई तुझा गाभारा
सौभाग्यच देणं माऊली दे ग तू आम्हाला
धावून येसी
धावून येई संकटकाळी शक्ती रूप दाता

गोंधळ मांडला न माझ्या माय माऊलीचा ग
उध उध उध उध उध उध

आज रातीला जागर चालला
तुझ्या दरबारी ग
घेऊन दिवट्या हस्ती हर्षे
गोंधळ घातला ग

उदो कारगर सती
उदो कारगर सती न माझे माय माऊलीचा ग
आज रातीला जागर चालला
आई तुझ्या दरबारी ग
कलियुगी अवतार आई तु आहे सत्वर

जीवे भावे ओवाळनी करितो
माझे आई ग
तुझी मनाची ओटी भरी ग
माझे आई ग
गळा घातली कवड्याची माळ ग
माझे आई ग
तुझा वाजवितो हाती संबळ
माझे आई ग

कुलस्वामिनी अंबाबाई गोंधळाला ये ग
गोंधळाला ये
आज रातीला जागर चालला
तुझ्या दरबारी ग
आज रातीला जागर चालला
तुझ्या दरबारी ग
आज रातीला जागर चालला
तुझ्या दरबारी ग

GONCHAL MAAY MAULICHA OFFICIAL VIDEO – PRAVIN-YOGITA KOLI

Leave a Comment

error: Content is protected !!