दर्याची मासोली DARYACHI MASOLI LYRICS IN MARATHI | JANHAVI KILLEKAR
ला ला ला ला ला ला ला ला
ला ला ला ला ला ला ला ला ला… X – 2
अरे राजा तू माझ्या शोन्या , हा रुसवा तू सोडून दे,
या दर्यकिनारी आपले पिरमाची ही चर्चा तू होऊन दे X -2
ह्या इशकाची जादू लई न्यारी, माझे ज्वाणीची बात लई भारी
राहीन फसवून तुला माझे जाल्यामंदी,आल/आयल तुफान जरी सागरमंदी…
या दर्याची मासोली हाय मी राजा, पिच्छा मी सोडायची न्हाय X -2
माझा तू झाल्याशिवाय र शोन्या, मी काय थांबायची न्हाय…
या दर्याची मासोली हाय मी राजा, पिच्छा मी सोडायची न्हाय || धृ ||
तुझे पिरमाची मी राणी हाय, तुझे नावाच कुंकू लावणार हाय X – 2
मस्तानी मी कोलीवाऱ्याची पन दिवानी तुझीच हाय
या समीनदारची सफर मी तुझेसंगतीन करणार हाय
या दर्याची मासोली हाय मी राजा, पिच्छा मी सोडायची न्हाय X – 2
माझा तू झाल्याशिवाय र शोन्या, मी काय थांबायची न्हाय… ||1||
या कोलीवाऱ्याचा मी नाखवा हाय, माझे दिलावरी राज तुझाच हाय X – 2
सफर ह्यो असू दे मोठा पण तुझें साथीनं करणार हाय
परवा जीवाची कसली गो जेव्हा संगतीन माझे तू हाय
या दर्याचा नाखवा मी हाय गो राणी माझी तू होणार हाय
मी, लगीन वरात, दारावरी तुझ्या घेऊन येणार हाय… ||2||