LAGNACHI PIPANI LYRICS | लग्नाची पिपाणी

LAGNACHI PIPANI LYRICS | लग्नाची पिपाणी

PLAY LAGNACHI PIPANI MARATHI SONG

LAGNACHI PIPANI LYRICS | लग्नाची पिपाणी

पिपाणी पिपाणी पिपाणी
वाजंल पिपाणी…

रोज रोज सपनात येतीया नटून
रूप तुझं चांदावाणी दिसतया ऊठून
गोरं गोरंअंग तुझं सोन्यावानी कांती
झोप न्हायी रातीला गं हरवली भ्रांती

अंग अंग नाचतया वाजत्याती गाणी
तुझ्या माझ्या लग्नाची
कवा वाजंल पिपाणी
पिपाणी पिपाणी पिपाणी पिपाणी पिपाणी पिपाणी….

हरणीची चाल तुझी ऐटदार डौल गं
चालताना पाठमोरी जाई माझा तोल गं
सखे तुझे बोल जशी कोकीळेची तान गं
ऐकताना आत आत हरपते भान गं

जवानीची तुझ्या टच्च भरलीया गोनी
अंग अंग नाचतया वाजत्याती गाणी
तुझ्या माझ्या लग्नाची
कवा वाजंल पिपाणी..

उंच उंच डोंगरावर घरटं तुला बांधीन
हवं ते सुख तुझ्या ओंजळीत टाकीन
तू गं खुळी रानमैना, मी गं तुझा राघू गं
तुझी माझी प्रीत जगा ओरडून सांगू गं

बघतील लोकं आमची रित खानदानी
अंग अंग नाचतया वाजत्याती गाणी
तुझ्या माझ्या लग्नाची कवा
कवा वाजंल पिपाणी…

LAGNACHI PIPANI VIDEO | SHIVANI BAOKAR

error: Content is protected !!