AAI BABA LYRICS WELL DONE BABY
मन सानुलं सोनुलं चिमुकलं साजिरं
मन फुलातल्या कळीपरी झालं कसं गोजिरं
मन सानुलं सोनुलं चिमुकलं साजिरं
मन फुलातल्या कळीपरी गोजिरं
दोन मनांच्या हसल्या आशा
जुळून आल्या गुलाबी रेषा
अजून एकजीव होणार आता आता
अजून एक जीव येणार आता आता
तुझ्या-माझ्या प्रेमासाठी ओ…
तुझ्या-माझ्या जन्मासाठी ओ…
बाळाची ही चाहूल म्हणते.. आई बाबा
सुखाचं या पाऊल म्हणते.. आई बाबा
श्वास तू बंध मी, रेशमी खुणा
फूल तू गंध मी, धुंद भावना
डोळ्यांत पाहूया.. दोघांत राहूया..
ये…. ना….
तुझ्या-माझ्या प्रेमासाठी ओ…
तुझ्या-माझ्या जन्मासाठी ओ…
बाळाची ही चाहूल म्हणते.. आई बाबा
सुखाचं या पाऊल म्हणते.. आई बाबा