THE LOCKDOWN SONG LYRICS
SINGER | Swapnil Chavhan |
MUSIC | Mayuresh Kelkar |
LYRICIST | Swapnil Chavhan |
PLAY THE LOCKDOWN SONG
THE LOCKDOWN SONG LYRICS – LALIT PRABHAKAR
हार्डय हार्डय बॉस
तुम्हाला समजणं हार्डय
या दिस इज कोरोना व्हायरस ..
नो नीड टू क्रिएट fuss
मी तुम्हाला एवढंच सांगायला आलोय बस….
मी तर आलो तुमच्या गावा
माझा रामराम घ्यावा
मला म्हणतात कोरोना
साला थोडा तो डरोना
तुम्ही विकी बबलू बंटी
साडी चॅलेंज वाल्या आंटी
तुम्हा सगळ्यांना विनंती
मेरी सबसे नही बनती
जर फुकट फिराल
तर फुकट मराल
माझे रूप तसे छोटे
पण लई विकराल
तुम्ही धरम जमात
आणली प्रत्येक कामात
सगळे लॉजिक कोमात
खरंतर जातपात दोन आहेत जगात
एकीकडे ते हुशार
दुसरा चुत्यांचा बाजार
खरा हुशार कधीच
कानून नाही तोडणार
पण गेम हा चूत्यांचा
माझ्या आजुला बाजूला
ज्यांनी ठोकला डॉक्टर
आणि पोलिस मारला
त्यांना आईची शप्पत
घेतो आता कोपच्यात
थाळी ठोकत आलेले
जेजे चौकात रस्त्यात
तुम्ही हुशार जमात
आहे अफवा ही फक्त
तुम्ही विष घोळतात
आणि झूठ तोलतात
थोडा खराटा फिरवा
मेंदू जोरात हलवा
कुणी जाऊन थांबवा
गल्ली गल्लीत कालवा
कालव्यात नाही पाणी
फक्त अफवांचा थवा
कुणी सांगते औषध
मला नाही दारू दवा
कुणी सोडलेत प्राणी
भुके उपाशी तपाशी
स्वतः खातो तू तुपाशी
अशी कशी बदमाशी
अरे बघ
अरे बघ
कधी माणूस म्हणून जग
ज्याची विझली ए चूल
ज्यांच्या कडेवर मुल
घेऊन चाल तिन्ही काल
मेले करून हालहाल
ज्यांनी गाठला मुलुख
त्यांची होती काय चूक
तुझ्या निबर मनाला
नाही ह्याची रुख रुखं?
कर मदत , फरफटत
जगणाऱ्या प्रत्येकाची
देतू दान है आसान
टच स्क्रीन आहे आता
ऑनलाईन राहता राहता
कर काम, थोडे नाम
अल्लाह, जीसस आणि राम
सगळे लांब तू जवळ
तूच आशेचा मोहोळ
दान देता येते बळ
शंभर हत्तींचे केवळ!
परवडत बिर्वडत
नाही असेल म्हणणे
तर एकच गाऱ्हाणे
आता घरीच रहाणे
थोडे घरीच रहाणे
आपल्या जगण्याचा थोडा
अर्थ लावून पाहाणे
मारली जी या सृष्टीची
आपल्या स्वार्थी जगण्याने
तिथे वळून पाहाणे
तिथे वळून पाहाणे
नैत सगळे देढ शाणे
होतील पक्का डेड शाने!
डेड! डेड! डेड! डेड! डेड डेड शाने!!
You saw what I did there..
This is Mr. corona signing off,
नंतर सांगू नका….
मी बोललो नव्हतो!!
Stay Home, Stay Safe.